२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग मोकळा

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यापर्णाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे.  तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून सध्या तो लॉस एंजेलिस मधे डिटेन्शन सेंटरमध्ये आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात १९९७ मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.