November 26, 2025 3:04 PM
767
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातल्या शहिदांना आदरांजली
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज १७ वर्ष पूर्ण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. दहशतवाद हा फक्त एखाद्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण ...