January 2, 2025 8:32 PM

views 30

जपानमध्ये सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित

जपानमध्ये आज सकाळी सायबर हल्ल्यामुळे अनेक वेबसाईटची सेवा खंडित झाली. वेबसाईटच्या प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे सेवा खंडित झाल्याची माहिती एनटीटी डोकोमो या जपानच्या सर्वात मोठ्या मोबाईल कंपनीनं दिली. जपानमध्ये अलीकडेच झालेल्या अशा प्रकारच्या सायबर हल्ल्यामुळे राष्ट्रीय बँका आणि विमानतळ ऑपरेटरसह, अनेक...

January 2, 2025 8:30 PM

views 37

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी टोळी उघडकीस

बांगलादेशी नागरिकांचे भारतात बेकायदेशीर स्थलांतर करणारी एक टोळी दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणली आहे. पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिक आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना अटक केली असून त्यांच्याकडून बनावट कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. गेल्या महिन्यात १२ बांगलादेशी नागरिकांना परत पाठवण्यात आ...

January 2, 2025 8:27 PM

views 14

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं सुरुवात

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांच्या वार्षिक ऊरुसाला अजमेर इथं आजपासून औपचारिकरित्या सुरुवात झाली. यंदा या ऊरुसाचं ८१३ वं वर्षे असून देशा-परदेशातील भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होतात.   केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी आज मझहार शरीफवर चादर चढवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावतीन...

January 2, 2025 8:24 PM

views 16

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी कार्यगटाची स्थापना 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या निश्चितीसाठी २०११ -१२ च्या ऐवजी २०२२-२३ हे वर्ष आधारभूत धरण्यासाठी एका कार्यगटाची स्थापना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने केली आहे. नीती आयोगाचे सदस्य प्रा. रमेश चंद या गटाचे अध्यक्ष असून इतर १८ सदस्य समितीवर आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. सुरजित भल्ला, प्रधानमंत्र्या...

January 2, 2025 8:19 PM

views 23

‘डीआरडीओनं संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात’

डीआरडीओ, अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आपल्या संशोधन आणि विकासाच्या प्रयत्नांमध्ये स्टार्ट अप्सचा समावेश करण्याच्या शक्यता तपासायला हव्यात, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं डीआरडीओ च्या ६७ व्या स्थापना दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या ...

January 2, 2025 8:15 PM

views 29

जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा – मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला

जम्मू-काश्मीरला लवकरात लवकर पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज केला. मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.

January 2, 2025 8:12 PM

views 31

कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्था उध्वस्त केल्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन

राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं जम्मू-कश्मीरमधे दहशतवाद केवळ नियंत्रितच केला नाही, तर कश्मिर खोऱ्यातली दहशतवादी परिसंस्थाच उध्वस्त केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत जम्मू-कश्मीरवरच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनानंतर बोलत होते.  ३७० वं कलम हटवल्यानंतर दहशतवादी कारवा...

January 2, 2025 8:09 PM

views 10

भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध – मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार

भटक्या विमुक्तांच्या उत्थानासाठी काम करायला सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भटक्या आणि विमुक्त जमातींच्या कल्याणाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. हा समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये, यास...

January 2, 2025 8:05 PM

views 15

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांसोबत बैठक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्षेत्रातल्या आणि भांडवली बाजारातल्या भागधारकांची बैठक घेतली. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची ही  सातवी अर्थसंकल्प-पूर्व सल्लामसलत बैठक होती. केंद्रीय अर्थ सचिव, आर्थिक व्यवहार विभागाचे ...

January 2, 2025 7:33 PM

views 28

रत्नागिरीत ‘किन्नर अस्मिता’ या तृतीयपंथीयांच्या पहिल्या स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापन

रत्नागिरी जिल्ह्यात किन्नर अस्मिता हा तृतीयपंथीयांचा पहिला स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला आहे. तृतीयपंथीयांना समाजाबरोबर जाता यावं, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी या गटाला सहकार्य केलं जाईल, अशी ग्वाही समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी दिली.