January 4, 2025 3:06 PM

views 30

दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली

दिल्ली इथं हवेची गुणवत्ता निकृष्ट दर्जापर्यंत घसरली असून आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सरासरी ए क्यू आय अर्थात वायू गुणवत्ता निर्देशांक ३८५ इतका झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीनुसार दिल्लीच्या काही भागांत वातावरण अत्यंत खराब म्हणजे वायू गुणवत्ता निर्देशांक ४०० इतक्या निचांकी पात...

January 4, 2025 2:50 PM

views 12

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्रमंत्री डॉ. अब्दुल्ला खलील यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा

भारताच्या दौऱ्यावर आलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ अब्दुल खलिल आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांच्या काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा झाली. भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार आणि क्षेत्रातल्या सर्वांसाठी सुरक्षा आणि वृद्धी अर्थात सागर या तत्वानुसार भारताचे मालदीव सोबतचे संब...

January 4, 2025 2:49 PM

views 23

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु असलेल्या ए एस बी क्लासिक टेनिस स्पर्धेत पुरुष एकल प्रकारात भारताच्या सुमित नागलनं न्यूझीलंडच्या अलेक्झांडर क्लीचारोवचा १-६, ६-३, ६-१ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम पात्रता फेरीत त्याची गाठ फ्रान्सच्या एड्रियन मॅनेरिनो याच्याशी पडणार आहे.

January 4, 2025 2:46 PM

views 16

पंतप्रधान मोदी यांनी बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बुद्धिबळपटू कोनेरू हंपी आणि तिच्या कुटुंबीयांची नवी दिल्लीत भेट घेतली. कोनेरू ही क्रीडा क्षेत्रातलं प्रेरणादायी व्यक्तिमत्व असून, उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देत आली असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. खळेमधली तिची विद्वत्ता आणि आणि निष्ठा ठळकपणे दिसते अशा शब्दांत...

January 4, 2025 2:43 PM

views 16

चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं

चीनमध्ये तापाच्या साथीचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला असल्याबद्दलचं वृत्त चीननं फेटाळलं आहे. यंदाच्या हिवाळ्यात श्वसनाच्या आजारांचे रुग्ण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले असल्याचंही चीननं म्हटलं आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी ही माहिती दिली. परदेशी नागरिकांकरिता चीनमध्ये प...

January 4, 2025 2:42 PM

views 47

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार

डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायदा, २०२३ च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण नियमावली, २०२५ चा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा मसुदा प्रसिद्ध केला. नागरिकांच्या डिजिटल स्वरुप...

January 4, 2025 2:40 PM

views 10

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु

गाजा पट्टीत संपूर्ण संघर्षविराम व्हावा, यासाठी कतारच्या दोहामध्ये इस्रायलबरोबर अप्रत्‍यक्ष चर्चा सुरु झाली आहे. हमासनं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. व्‍यापक आणि अस्‍थायी संघर्ष विराम तसंच गाजामधून इस्रायली सैनिकांची माघार हे मुद्दे या चर्चेच्या केंद्रस्थानी असतील. विस्थापित पॅलेस्टिनी नागरिकांना त्वर...

January 4, 2025 2:38 PM

views 87

सर्वत्र जागतिक ब्रेल दिवस साजरा

आज जागतिक ब्रेल दिवस साजरा होत आहे. दृष्टिहीन आणि अंशतः दृष्टिहीन व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रेलबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. वर्ष 2018 मध्ये संयुक्‍त राष्‍ट्र महासभेनं ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून चार जानेवारीला ब्रेल दिवस साजरा करण्याचा ...

January 4, 2025 2:37 PM

views 93

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम – मुख्यमंत्री

भारतीय सेनादल हे जगातल्या सर्वोत्तम सेनादलांपैकी एक असून भूदल, नौदल आणि वायुदल अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. समर्थ भारत, सक्षम सेना या संकल्पनेअंतर्गत लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात आयोजित केलेल्या नो युवर...

January 4, 2025 2:34 PM

views 9

भारत आणि इराण दरम्यान नवी दिल्लीत झालेल्या एकोणिसाव्या परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा

भारत आणि इराण दरम्यान काल नवी दिल्लीत झालेल्या एकोणिसाव्या परराष्ट्र व्यवहार विषयक सल्लागार बैठकीत दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्यात आला. यावेळी चाबहार बंदर, कृषी सहकार्य, व्यापार आणि आर्थिक क्षेत्रासह इतर अनेक मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली. याशिवाय अफगाणिस्तान आणि पश्चिम आशिया म...