January 4, 2025 6:31 PM

views 6

सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार- शिवराज सिंग चौहान

उत्पादक आणि उपभोक्ता राज्यांमधली दराची तफावत दूर करण्यासाठी सरकार वाहतूक आणि साठवणूकीच्या किंमतीचा भार उचलणार असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे. ते आज नवी दिल्लीत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावर्षी ...

January 4, 2025 6:29 PM

views 20

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची २९ उमेदवारांची यादी जाहीर

आगामी दिल्ली निवडणुकांसाठी नवी दिल्लीत भाजपनं आज आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात माजी खासदार परवेश वर्मा यांची तर कलकाजी इथल्या जागेसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबरोबरच,  या निवडणुकांसाठी आपल्या पहिल्या २९ उमेदवारांची यादी ...

January 4, 2025 6:01 PM

views 23

युनिअन कार्बाइडचा धोकादायक कचरा जाळण्याविरोधात निदर्शनं

मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी आश्वासन देऊनसुद्धा युनिअन कार्बाइडचा धोकादायक कचरा जाळण्याविरोधात आज पिथमपूर इथे निदर्शनं करण्यात आली. यावेळी काही समाजकंटकांनी रामकी इन्व्हायरो इंडस्ट्रीजच्या प्रवेशद्वारावर दगडफेकही केली. याच ठिकाणी हा कचरा जाळला जाणार आहे.    अद्याप या ठिका...

January 4, 2025 3:57 PM

views 28

मुंबईत प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई मोहीम आजपासून पुन्हा सुरु

मुंबईत थंडावलेली प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई मोहिम आजपासून पुन्हा कडक केली जाणार आहे. २०१८ मधलं प्लास्टिक बंदीचं धोरण आताही लागू असेल, असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलं आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या वापरल्यास, बाजारपेठा, हॉटेल, मॉलसह सामान्य नागरिकांवरही आता नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार...

January 4, 2025 3:53 PM

views 45

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार जणांना अटक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या ड्युटी फ्री दुकानांमध्ये काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना महसूल गुप्तचर संचालनालयानं अटक केली आहे. तस्करीचं सोनं विमानतळाबाहेर पोहोचवण्याचं काम ते करत असत. त्यांच्याकडून सुमारे ४ कोटी ८४ लाख रुपये किमतीची ६ किलो सोन्याची भुकटीही जप्त करण्यात...

January 4, 2025 3:59 PM

views 27

सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू

खराब हवामानामुळे द्राक्षाची बाजारपेठेतील आवक लांबल्यानंतर, आता सांगलीच्या बाजारपेठेत द्राक्षाची आवक सुरू झाली आहे. स्थानिक विक्री बरोबरच द्राक्ष निर्यातीलाही सुरुवात झाली आहे. दुबई आणि सौदी अरेबियात नऊ कंटेनर्स मधून १७२ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. सांगली जिल्ह्यात यंदा ८ हजार ४४० शेतकऱ्...

January 4, 2025 3:49 PM

views 25

पंजाबमध्ये झालेल्या रस्ते अपघातात ३ जण ठार, ३० जण जखमी

पंजाब मध्ये बर्नाला इथं आज झालेल्या एका रस्ते अपघातात ३ जण ठार आणि ३० जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्यानं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. जखमींना भटिंडा आणि फरीदकोट इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

January 4, 2025 8:18 PM

views 45

विख्यात भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं निधन

भारताच्या विज्ञान क्षेत्रात मत्त्ववपूर्ण योगदान देणारे विख्यात भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार, भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणु  ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणु ऊर्जा विभागाचे केंद...

January 4, 2025 3:40 PM

views 20

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद नव्या कायद्यात करणार

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. नव्या कायद्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांनी करायच्...

January 4, 2025 3:07 PM

views 32

अमेरिकेच्या पायाभूत प्रणालीत संगणक घुसखोरी केल्याबद्दल इंटेग्रिटी टेक्नॉलॉजी या चीनच्या सायबर सुरक्षा कंपनीवर अमेरिकेनं घातले निर्बंध

अमेरिकेच्या पायाभूत प्रणालीत संगणक घुसखोरी केल्याबद्दल इंटेग्रिटी टेक्नॉलॉजी या चीनच्या सायबर सुरक्षा कंपनीवर अमेरिकेनं निर्बंध घातले आहेत. फ्लॅक्स टायफून या हॅकिंग गटात या कंपनीचा मोठा सहभाग असल्याचं अमेरिकेच्या सरकारी निवेदनात म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाची काही कागदपत...