January 5, 2025 7:37 PM

views 14

बीडमधे स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान

बीड जिल्ह्यात, स्वच्छ माझे अंगण उपक्रमांतर्गत ४ लाख ७२ हजारहून अधिक कुटुंबांमध्ये स्पर्धा होणार असून येत्या प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कुटुंबाचा सन्मान केला जाणार आहे.    बीड जिल्ह्यात १३५ गावामध्ये घन कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार काम सुरू आहे. यासंबंधी ग्रामस्थांमध्ये अधिक जनजागृत...

January 5, 2025 7:39 PM

views 22

NIA:पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सज्जाद आलमला अटक

राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएनं, फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्युल प्रकरणात पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सज्जाद आलम या मुख्य आरोपीला काल अटक केली. पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना  दहशतवादी कारवायांना रसद पुरवत असल्याचा आरोप असून या संघटनेवर सरकारनं बंदी घातली आहे.   बिहार मधल्या पटना ...

January 5, 2025 8:12 PM

views 26

मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर, आंदोलनाच्या निमित्ताने खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया हे सगळे जण जाहीर सभांमध्ये समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्यं करत आहेत. आपल्या विधानांतून ते मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट...

January 5, 2025 8:33 PM

views 15

दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेसाठी १७ दिव्यांग खेळाडूंची निवड

श्रीलंकेत होणार असलेल्या दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेकरता भारतीय निवड समितीनं आज १७ दिव्यांग खेळाडूंची निवड केली असून संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी विक्रांत रवींद्र केणीवर सोपवली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना १२ जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या दोन संघात रंगणार असून अखेरचा सामना २१ जानेवारीला होण...

January 5, 2025 7:27 PM

views 16

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस वितरण

आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं बक्षीस वितरण आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध स्पर्धांमधे चमकदार कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.   महारेलने राज्यात बांधलेल्या सात उड्डाणपुलांचं लोकार्पणही आज  मुख्यमंत्र्यांच्या हस...

January 5, 2025 7:25 PM

views 24

शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज – शरद पवार

'शेती क्षेत्रात उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची गरज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरीनं आयोजित केलेल्या कृषी आणि पशुधन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यानं घडलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात दा...

January 5, 2025 7:20 PM

views 22

नांदेड स्फोट प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाची १२ जणांची निर्दोष मुक्तता

नांदेड मध्ये पाटबंधारे नगर भागात ६ एप्रिल २००६ रोजी झालेल्या स्फोट प्रकरणी नांदेड जिल्हा सत्र न्यायालयानं १२ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या स्फोटात दोन जण ठार झाले होते. या प्रकरणाच्या पोलीस तपासात वेगवेगळ्या बाबी पुढे आल्या होत्या. त्यानंतर तो  सीबीआय कडे सोपवण्यात आल्यानंतर सी बी आयनं सखोल तप...

January 5, 2025 7:22 PM

views 13

ईडीचे मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४ हजार ९५७ कोटी रुपयांच्या  कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले ...

January 5, 2025 7:17 PM

views 21

राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज-बाबासाहेब पाटील

राज्यात नव्यानं मोठी सहकार चळवळ उभी करण्याची गरज असून येत्या पाच वर्षात १० हजार सहकारी संस्था उभारण्याचं राज्य सरकारचं धोरण आहे, असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज सोलापूर इथं बोलत होते. पाटील यांनी आपल्या सोलापूर दौऱ्यात सहकार चळवळीचा आढावा घेतला. सहकारी संस्थाना पतपुरवठा करणं ...

January 5, 2025 7:00 PM

views 14

उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज उत्तर मुंबईत भाजपच्या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली. गोयल स्वतः बोरिवली रेल्वेस्थानकाजवळ आयोजित सदस्य नोंदणी अभियानात सहभागी झाले होते. अधिकाधिक नागरिकांनी भाजपाचं सदस्यत्व स्वीकारावं, असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं.  &...