July 11, 2025 3:28 PM

views 23

इगतपुरीजवळील अपघातात ४ जण ठार

इगतपुरीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव इथं काल कारवर कंटेनर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. हे सर्वजण अंधेरीत राहणारे होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गरुडेश्वर इथल्या बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात दर्शन घेउन मुंबईला परतताना हा अपघात झाला.

July 11, 2025 3:25 PM

views 48

गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येणार- उपमुख्यमंत्री

मुंबई शहर आणि परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येतील असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल  विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्...

July 11, 2025 3:58 PM

views 25

शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार

शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे.    या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायच...

July 11, 2025 3:15 PM

views 15

अमेरिकेत बेकायदेशीर नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या न्यायाधीशांनी रोखून धरला

अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरित आणि परदेशी आगंतुक यांनी जन्म दिलेल्या बालकांना नागरिकत्वाचा अधिकार न देण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा आदेश न्यूहँपशायरच्या एका न्यायाधीशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार अमेरिकेत जन्मलेल्या सर्व बाळांना नागरिकत्वाची हमी दिलेली आहे.   परंतु...

July 11, 2025 3:09 PM

views 19

Anderson Tendulkar Trophy: तिसऱ्या सामन्यातल्या दुसरा दिवसाचा खेळ आज दुपारी 3:30 वाजता

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यातल्या दुसरा दिवसाचा खेळ आज दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या चार बाद २५१ धावा झाल्या होत्या. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने दोन, तर रविंद्र जडेजा आणि जसप्रित बुमराहनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

July 11, 2025 3:05 PM

views 14

युपीआयमुळं भारतातल्या डिजिटल व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल

भारतात युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यानं इतर देशांच्या तुलनेत भारतानं वेगानं पैसे हस्तांतर होत असल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलंय. युपीआयमुळं भारतातल्या डिजिटल व्यवहारांमध्ये आमुलाग्र बदल झाले आहेत. या माध्यमातून महिन्याला १८ अब्ज व्यवहार होत असल्याचं नाणेनिधीनं नमूद केलं आहे.

July 11, 2025 3:00 PM

views 38

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करणार

भारतीय रेल्वे सुरक्षा वाढवण्यासाठी नवीन निरीक्षण प्रणाली सुरू करत आहे. ही निरीक्षण प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही प्रणाली चालत्या रेल्वे गाड्यांच्या फोटोवरुन अनियमितता असलेल्या सुट्या भागांची माहिती दुरुस्ती यंत्रणांना देते. यामुळं संभाव्य अपघात टाळण्यात मद...

July 11, 2025 2:49 PM

views 18

मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता

पंजाब मंत्रिमंडळाने १० लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस वैद्यकीय उपचार देण्यासाठी मुख्यमंत्री सेहत योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होईल.   या योजनेअंतर्गत नागरिकांना सामान्य सेवा केंद्रांवर आरोग्य कार्ड दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त  नागरिकांना आधार कार्ड किंवा मतदार ओळखप...

July 11, 2025 2:47 PM

views 18

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू

एक राष्ट्र एक निवडणूक याबाबतच्या संयुक्त संसदीय समितीची बैठक संसद भवनात सुरू आहे. या बैठकीत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड तसंच न्यायमूर्ती जगदीश सिंग खैहर समितीसमोर सादरीकरण करतील. 

July 11, 2025 1:33 PM

views 23

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज जोकोविच, यानिक सिनर, अल्काराज यांचे सामने

विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात आज नोव्हाक जोकोविच याच्यासमोर अग्रमानांकित यानिक सिनर याचं आव्हान असेल, तर दुसऱ्या सामन्यात कार्लोस अल्काराज आणि टेलर फ्रिट्झ आज एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील.   महिला एकेरीत काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमांडा अनिसिमोव्हा हिनं अग्रमानांकित अरीना...