July 12, 2025 7:49 PM

views 30

जयंत पाटील यांच्या राजीनामाच्या वृत्ताचं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून खंडन

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या. मात्र, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्र आव्हाड यांनी या बातम्या म्हणजे निव्वळ खोडसाळपणा असल्याचं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. जयंत पाटील हेच...

July 12, 2025 7:43 PM

views 28

नवी मुंबई विमानतळाचं काम सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम ३० सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांनी या विमानतळाची पाहणी केली आणि आणि धावपट्टीपासून ते टर्मिनल इमारतीपर्यंतच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. ह...

July 12, 2025 7:38 PM

views 17

राज्यातही विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन

राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आज रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री मंत्री पियुष गोयल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथलं रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून १८९ नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वाटप केलं. हा दिवस फक्त नोकरी मिळण्याचा नाही, तर देशाच्या विका...

July 12, 2025 7:26 PM

views 10

अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात के. एल. राहुलची शतकी खेळी

भारत आणि इंग्लडदरम्यान अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या दिवशी भारतानं ३ गडी बाद १४५ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. के. एल. राहुल यानं कसोटीतलं दहावं शतक झळकवलं. तर रिषभ पंतने ७४ धावा फटकावल्या....

July 12, 2025 4:44 PM

views 26

आषाढीला एसटीच्या ५ हजार २०० जादा बसगाड्यांतून ९ लाखांहून अधिक भाविकांची सुरक्षित वाहतूक

आषाढी यात्रेनिमित्त यंदा ५ हजार २०० जादा बसगाड्यांच्या माध्यमातून एसटीने साडे एकवीस हजार फेऱ्यांद्वारे तब्बल ९ लाख ७१ हजार ६८३ भाविक - प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली आणि त्यांना विठ्ठल दर्शन घडवलं आहे. या सेवेतून एसटीला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि...

July 12, 2025 4:01 PM

views 25

मोबाईल टॉवरचे यंत्र चोरणाऱ्या टोळीला अटक

मोबाईल टॉवरचे बेसबॅन्ड युनिट चोरणाऱ्या चारजणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. हे उपकरण चोरी करणाऱ्यांकडून 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मोबाईल टॉवरचे 5 जी बेसबॅन्ड चोरी होण्याचं प्रमाण तळोजा, खारघर, पनवेल शहर या भागात वाढलं होतं. उपकरणं चोरी झाल्याने नेटव...

July 12, 2025 7:50 PM

views 13

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिलांचा अंतिम सामना इगा श्वियांतेक आणि अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात इगा श्वियांतेक हिच्यासमोर अमांडा अनिसिमोव्हा हिचं आव्हान असेल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री साडेआठला सुरु होईल.   तर उद्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित यानिक सिनर आणि गतविजेता कार्लोस अल्काराज एकमेकांविरुद्ध मैदानात उ...

July 12, 2025 1:44 PM

views 24

प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात सामंजस्य करार

हॅण्डबॉलच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धांचं प्रक्षेपण करण्याच्या उद्देशाने  प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे आता डीडी स्पोर्ट्स, वेव्हज् ओटीटी आणि प्रसार भारतीच्या इतर वाहिन्यांवरून हॅण्डबॉल स्पर्...

July 12, 2025 1:30 PM

views 16

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध वन्यप्राणी जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये विविध वन्यप्राणी जप्त केले आणि दोघांना अटक केली. पहिल्या प्रकरणात गुप्त माहितीच्या आधारे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बँकॉक इथून मुंबईला उतरलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन जिवंत आणि एक मृत मि...

July 12, 2025 1:21 PM

views 7

‘उडान यात्री कॅफे’ लवकरच सुरू होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले उडान यात्री कॅफे लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई मंत्री के. राममोहन नायडू यांनी केली. देशात विमानसेवा वाढवण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईत आयोजित पश्चिम क्षेत्र मंत्री परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद...