July 19, 2025 8:43 PM

views 39

केरळात अतिशय जोरदार पाऊस, ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट

केरळात आज अतिशय जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्रविभागाने वर्तवला असून ५ जिल्ह्यांसाठी रेड ॲलर्ट दिला आहे. या ठिकाणी आज शाळांना सुट्टी दिली होती. कासारगोड आणि कन्नूरला उद्यासाठी देखील रेड ॲलर्ट दिला आहे.  वायनाडमधे गेल्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे मुंदक्की चूरलमाला परिसरात...

July 19, 2025 7:16 PM

views 24

पाकिस्तान पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ जणांचा मृत्यू, ४६२ हून अधिकजण जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वादळी पावसामुळे १२३ पेक्षा जास्तजणांचा मृत्यू झाला तर ४६२ हून जास्त लोक जखमी झाले. गेल्या दोन दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमधे १० जणांचा बळी गेला. आपत्तीग्रस्त भागात सरकारचा कोणाही प्रतिनिधी पोहोचलेला नाही, तसंच आपत्तीग्रस्तांना कोणतीही मदत मिळालेली नाही. निवारा शि...

July 19, 2025 7:13 PM

views 18

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक

ऑस्ट्रेलियात सनशाइन कोस्ट इथं झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणितऑलिंपियाड मध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक मिळालं आहे. तसंच  दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता यांनाही सुवर्णपदक मिळालं आहे. सहा स्पर्धकांच्या भारतीय संघाने ३ सुवर्ण , २ रौप्य आणि १ कांस्य पदकं मिळवली आहेत. कर्नाटकचा अब...

July 19, 2025 6:30 PM

views 14

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह आणि उपकरण खरेदीसाठी साडे चारशे कोटी रुपयांहून अधिक तरतूद झाली आहे.    

July 19, 2025 6:16 PM

views 66

काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे, दहाजणं ताब्यात

जम्मू-काश्मिर पोलिसांच्या गुप्तचर विभागानं काश्मिर विभागात १० ठिकाणी छापे टाकले आणि १० जणांना ताब्यात घेतलं. हे सर्वजण इनक्रिप्टेटेड मेसेजिंग अॅपचा वापर करुन संदेशांची देवाणघेवाण करत होते. पाकिस्तानस्थित जैश-ए-महम्मद आणि लष्कर - ए- तयब्बाच्या दहशतवाद्यांशी त्यांचा संपर्क होता, असाही संशय आहे. यावेळी...

July 19, 2025 6:12 PM

views 12

कांदळवनाची पुनर्स्थापना करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आदेश

कांदळवनाच्या परिसरात बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरचे भराव हटवून मूळ कांदळवनाची पुनर्स्थापना  करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत. त्या आज अंधेरी इथल्या लोखंडवाला बॅक रोड परिसरात कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पाहणी केल्यानंतर बोलत होत्या. कांद...

July 19, 2025 5:44 PM

views 26

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उत्तराखंडमधे विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज उत्तराखंडमध्ये रुद्रपूर इथं उत्तराखंड सरकारच्या १ हजार २७१ कोटी रुपये किमतीच्या विविध विकास कामांचं उदघाटन आणि पायाभरणी केली. रुद्रपूर इथं आयोजित ‘उत्तराखंड गुंतवणूक महोत्सव २०२५’ मध्ये त्यांनी देशभरातले  गुंतवणूकदार आणि उद्योजकांशी संवाद साधला. उत्तराखंड सारख्या...

July 19, 2025 4:00 PM

views 33

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सामना रंगणार

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.   खेळ साडेतीन वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेत आघाडी घेतली आहे.  तिसरा आणि शेवटचा सामना २२ जुलै रोजी होणार आहे.

July 19, 2025 3:50 PM

views 31

रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी हिंगोली इथल्या सखी वन स्टॉप सेंटरला भेट दिली. पीडित महिलांनी आणि विद्यार्थिनीनी या मदत केंद्राची मदत घेऊन आपले प्रश्न सोडवावेत असं आवाहन यावेळी चाकणकर यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

July 19, 2025 3:40 PM

views 6

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

गणेशोत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन  रेल्वेनं येत्या २२ ते २७ ऑगस्ट दरम्यान जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रत्नागिरी, सावंतवाडी आणि मडगावपर्यंत तसंच पुणे स्थानकापासून रत्नागिरीपर्यंत गाड्या प्रवास करतील. दिवा ते चिपळूण पूर...