July 31, 2025 1:38 PM

views 24

केरळच्या मासेमारी नौका पुन्हा समुद्रात जाण्यासाठी सज्ज

केरळच्या किनाऱ्यालगत यांत्रिक पद्धतीनं आणि  ट्रॉलर द्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीवरील प्रतिबंध आजपासून हटवण्यात आले आहेत. गेल्या ५२ दिवसांपासून ही मासेमारी बंद करण्यात आली होती. माशांच्या प्रजनन काळामुळे ही बंदी घालण्यात आली होती. आता मासेमारी नौका पुन्हा समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

July 31, 2025 1:33 PM

views 21

राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं निधन

राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांचं आज नागपुरात वार्धाक्यानं निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांचं पार्थिव नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. प्रमिलाताईंच्या इच्छेनुसार त्यांचा देह एम्स रुग्णालयाला दान करण्यात येणार आहे.    राष...

July 31, 2025 1:23 PM

views 32

बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार

बिहार मतदार याद्यांचा मसुदा निवडणूक आयोग उद्या प्रसिद्ध करणार आहे. कुण्या मृत व्यक्तीचं नाव यादीत असेल किंवा एका व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेलं असेल तर त्यात दुरुस्ती करणं हा याचा हेतू आहे. मतदार याद्यांचा हा मसुदा तात्पुरता असेल, यावर आक्षेप नोंदवल्यावर यात दुरुस्ती केली जाईल असं नि...

July 31, 2025 10:42 AM

views 52

भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द

भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजंड्सच्या आयोजकांनी भारतीय चॅम्पियन्स आणि पाकिस्तानी चॅम्पियन्स यांच्यातील उपांत्य सामना रद्द केला आहे. दहशतवाद्यांना पाठिंबा आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका यामुळं भारतीय संघानं खेळातून माघार घेतली आण...

July 31, 2025 10:29 AM

views 32

UK मध्ये पहिल्यांदाच राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ म्हणून एका महिलेची नियुक्ती

युनायटेड किंग्डममध्ये पहिल्यांदाच राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ म्हणून एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रोफेसर मिशेल डोहर्टी यांना ही ऐतिहासिक संधी मिळाली आहे. राजघराण्याचा खगोलशास्त्रज्ञ हे एक प्रतिष्ठीत पद असून 1675 पासून आतापर्यंत साडेतीनशे वर्षांच्या काळात कधीच महिलांना ही संधी मिळाली नव्हत...

July 31, 2025 10:10 AM

views 22

भारत करणार येत्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन

पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धीमत्ता प्रभाव शिखर परिषदेचं आयोजन भारत करणार आहे. केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल संसदेत ही माहिती दिली.   आरोग्य, शिक्षण, कृषी, हवामान बदल आणि प्रशासन यासारख्या वास्तव जगातल्या समस्यांचा सामना...

July 31, 2025 10:01 AM

views 10

उद्यापासून बँकिंग सुधारणा कायदा 2025 अमलात येणार

बँकिंग सुधारणा कायदा 2025 उद्यापासून अमलात येणार आहे. बँकिंग क्षेत्रातल्या प्रशासकीय मानकांमध्ये आणि ठेवीदार, गुंतवणूकदारांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने हा कायदा करण्यात आला. सार्वजनिक बँकांच्या लेखापरीक्षणात सुधारणा करणे आणि सहकारी बँकांच्या संचालकांच्या कार्यकाळात वाढ करणे हादेखील...

July 31, 2025 9:57 AM

views 20

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह संस्थेकडून सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह संस्थेनं अल्प मुदतीसाठीच्या व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार व्याज दरात कपात करण्याचं आवाहन करुनही या वर्षात सलग पाचव्यांदा व्याजदर स्थिर ठेवण्यात आले. गेल्या वर्षी व्याजदरात तीन वेळा कपात करुन तो सुमारे 4 पूर्णांक 3 द...

July 31, 2025 9:41 AM

views 9

राष्ट्रपती मुर्मू आज झारखंडमधील AIIMS च्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज झारखंडमधील देवघर येथील AIIMSच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. दीक्षांत समारंभात त्या ४ सुवर्णपदक विजेत्या आणि ५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतील.   राष्ट्रपती उद्या आयआयटी-आयएसएम धनबादच्या ४५ व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील, जिथे त्या २०...

July 30, 2025 8:35 PM

views 19

Nigeria : अचानक आलेल्या पुरात २३ जणांचा मृत्यू, ११ जण बेपत्ता

नायजेरियामधे अदामावा राज्यात अचानक आलेल्या पुरात किमान २३ जणांचा मृत्यू झाला असून ११ जण बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मानवतावादी समन्वय कार्यालायाने ही माहिती दिली. योला परिसरात आलेल्या या पुरात साडेपाच   हजाराहून जास्त लोक बेघर झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा निचरा करण्याच्या यंत्रणेचा अ...