August 11, 2025 5:52 PM

views 31

वाशीममध्ये भटक्या समाजाच्या नागरिकांनी पालावर फडकावला तिरंगा

येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा राबवण्यात येत आहे. या निमित्ताने वाशीम शहरातल्या भटक्या समाजाच्या नागरिकांनीही आपल्या पालावर आज तिरंगा फडकावला. या कुटुंबांमधल्या ज्येष्ठांनी लहान मुलांना तिरंग्याचा अर्थ, बलिदानाची गाथा आणि देशभक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं.   हिंगो...

August 11, 2025 3:35 PM

views 24

वन्यजीव संरक्षणासाठी एकात्मिक विकास योजनेचा अवलंब – वनमंत्री

देशभरात वन्यजीव अधिवासांचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं एकात्मिक विकास योजनेचा अवलंब केला जात असल्याची माहिती केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.  वन्यजीव अधिवास संवर्धनासाठी तसंच मानव- वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारक...

August 11, 2025 3:02 PM

views 11

मुंबईतल्या कबुतरखान्यांसदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबईतल्या कबुतरखान्यात कबुतरांना खायला घालू नये या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला नकार देत कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला आज दिले. याचिकाकर्त्यांनी आदेशात बदल करण्याची विनंती उच्च न्यायालयात करावी ...

August 11, 2025 3:00 PM

views 9

तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये गर्दी

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्तानं आज राज्यातल्या शिव मंदीरांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.   मराठवाड्यात वेरुळ इथलं घृष्णेश्वर, परळी इथलं वैद्यनाथ आणि औंढा इथल्या नागनाथ, या ज्योतिर्लिंग स्थळीदेखील नागरिक मोठ्या संख्येनं दाखल होत आहे. स्थानिक प्रशासनांनी भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अनेक ...

August 11, 2025 3:14 PM

views 35

लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत नवीन प्राप्तिकर विधेयक मांडलं. याआधीच्या प्राप्तिकर विधेयकात काही त्रुटी आढळल्यानं सरकारनं ते गेल्या आठवड्यात मागे घेतलं होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज सकाळी विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुप...

August 11, 2025 2:52 PM

views 20

निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा

निवडणूक आयोग पक्षपातीपणे काम करीत असल्याचा आरोप करुन, इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाच्या दिल्लीतल्या कार्यालयावर मोर्चा काढला.   बिहारमधलं मतदारयाद्या पुनरिक्षण रद्द करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. पोलिसांनी मोर्चा अडवला तेव्हा आंदोलनकर्त्या खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या दिला. ...

August 11, 2025 2:47 PM

views 11

युक्रेनमधल्या युद्धविरामाबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष आणि रशियाचे अध्यक्ष १५ तारखेला भेटणार

अमेरिका आणि रशिया यांच्यात होणाऱ्या संभाव्य युद्धविराम करार चर्चेमध्ये युक्रेन आणि युरोपीय महासंघाचाही सहभाग असला पाहिजे, असं महासंघाचे परराष्ट्रविभाग प्रमुख काजा कल्लास यांनी म्हटलं आहे. यूरोपीय महासंघातल्या परराष्ट्र मंत्र्यांची ऑनलाईन बैठक आज झाली असून त्यात पुढच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याचंही ...

August 11, 2025 2:39 PM

views 32

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांचं दहशवाद्यांविरोधातलं अभियान सलग अकराव्या दिवशी सुरू आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळाला चोहोबाजूंनी घेरलं असून या परिसरातलं हे आतापर्यंतचं सर्वात दीर्घ अभियान असल्याचं सांगितलं जात आहे. या अभियानात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले असून दोन जवानां...

August 11, 2025 1:31 PM

views 20

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी विविध कारणांवरून गदारोळ केल्यामुळे आज दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. सकाळी अकरा वाजता राज्यसभेचं कामकाज  सुरु होताच उपाध्यक्ष हरिवंश यांनी शून्य प्रहर  पुकारण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधकांनी बिहारमधल्या मतदारयाद्या प...

August 11, 2025 1:29 PM

views 17

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा आरोप

काँग्रेस शत्रुराष्ट्रांची भाषा बोलत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. हातून सत्ता गेल्यामुळे अराजक माजवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. घुसखोरांना मतदार घोषित करुन काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे, असं ते म्हणाले.