August 13, 2025 10:26 AM

views 22

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रिय मंत्री डॉ. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव आणि पीयूष गोयल यामध्ये सहभागी होतील.   सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्...

August 13, 2025 10:14 AM

views 15

जागतिक वुशु स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारताच्या नम्रता बत्राची ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील चेंगडू इथं झालेल्या जागतिक स्पर्धेत वुशू मध्ये भारतासाठी पहिलं पदक जिंकून नम्रता बत्रा हिनं इतिहास रचला आहे. फिलिपिन्सच्या क्रीझान फेथ कोलाडोवर दमदार विजय मिळवत नम्रतानं अंतिम फेरीत प्रवेश करुन पदक निश्चित केलं. मात्र मेंगुई चेन बरोबर सुवर्णपदकासाठी झालेला सामना नम्रताला 0-2 असा गमवावा लागला...

August 13, 2025 10:04 AM

views 24

सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत वेगानं प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सेमीकंडक्टर क्षेत्रात देश वेगाने प्रगती करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाच्या डिजिटल भविष्याला बळ देण्यासाठी याद्वारे एक गतीमान परिसंस्था उभारली जात असून जागतिक नवोन्मेषालाही चालना मिळत आहे असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं. काल केंद्रिय मंत्रीमंडळा...

August 12, 2025 8:19 PM

views 24

‘एक देश- एक निवडणूक’ अहवालासाठी संयुक्त समितीला लोकसभेची मुदतवाढ

‘एक देश- एक निवडणूक’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेनं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल.   भाजपा खासदार पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला होता.

August 12, 2025 8:06 PM

views 23

विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्राकडील बाजू ढासळली; शिवप्रेमींची डागडुजीची मागणी

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात अलीकडेच समावेश झालेल्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या व्यंकट बुरुजाची समुद्रातली खालची बाजू लाटांच्या माऱ्यानं ढासळली आहे. समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या स्थानिकांच्या निदर्शनाला ही बाब आली. ही माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे. &...

August 12, 2025 7:57 PM

views 29

३० कोटींच्या जीएसटी अफरातफरप्रकरणी मॅजिक गोल्ड कंपनीचा संचालक अटकेत

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने मॅजिक गोल्ड बुलियन या कंपनीविरोधात केलेल्या कारवाईत कंपनीचा संचालक यशवंत कुमार टेलर याला अटक केली आहे. टेलर याने ३० कोटी ५१ लाख रुपयांच्या महसुलात अफरातफर केल्याचा आरोप आहे.   वस्तुंचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बिलं जारी करणाऱ्या पुरवठादारांकडून चुकीच्या पद्ध...

August 12, 2025 7:48 PM

views 24

चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ओदिशा, पंजाब आणि आंध्र प्रदेशातल्या ४ हजार ५९४ कोटी रुपयांच्या चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं हा न...

August 12, 2025 7:39 PM

views 41

कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुढचा आठवडाभर कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.   या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

August 12, 2025 7:33 PM

views 15

राज्यभरात तिरंगा मोहिमेंतर्गत रॅली,स्पर्धा आणि विविध उपक्रमांचे आयोजन

देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत. पनवेल महानगर पालिकेमार्फत 'हर घर तिरंगा’ मोहिम विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात राबवली जात आहे. ...

August 12, 2025 7:24 PM

views 26

१८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं मुंबईत उद्घाटन

भारतात परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करत होते. भारतीय अनेक ...