August 21, 2025 12:52 PM

views 10

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधू नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सखल भागातल्या गावांमधले हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे या भागातलं पशुधनही बाधित झालं आहे.    सरगोधा, फैसलाबाद, आणि इतर शहरांमध्ये तसंच लाहोर, गुजरांव...

August 21, 2025 1:21 PM

views 12

उपराष्ट्रपतीपदासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज दाखल

इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, रामगोपाल यादव यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. ...

August 21, 2025 12:35 PM

views 24

फिजीचे प्रधानमंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

फिजीचे प्रधानमंत्री सितीवेनी लिगामामदा राबुका रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राबुका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. दोन्ही देशातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राब...

August 20, 2025 9:02 PM

views 30

ऑनलाइन गेमिंगबाबतचं विधेयक लोकसभेत मंजूर

विरोधकांच्या गदारोळातच, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी, प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग विधेयक, २०२५ लोकसभेत मांडलं. ई-स्पोर्ट्स, शैक्षणिक आणि सामाजिक गेम्स यासह ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला चालना देणं आणि त्यावर नियमन आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. याद्वारे ...

August 20, 2025 9:00 PM

views 182

ठाणे, पुणे, नाशिक आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाचा रेड अलर्ट

राज्यात मुंबई आणि रत्नागिरीत पावसाचा जोर आज सकाळपासून ओसरू लागला आहे. मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातल्या राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.    नवी मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा ...

August 20, 2025 9:03 PM

views 6

छत्तीसगडमधे २९ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमध्ये १० महिला नक्षलवाद्यांसह एकंदर २९ नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. त्यांच्यावर सुमारे ५५ लाख रुपयांचं इनाम होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन धोरणानुसार आत्मसमर्पण केलेल्या प्रत्येक नक्षलवाद्याला ५० हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहन निधी म्हणून दिली गेल...

August 20, 2025 3:21 PM

views 15

पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ जाहीर

येत्या २९ ऑगस्टपासून बिहार इथे होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा १८ सदस्यीय संघ आज जाहीर झाला. हरमनप्रीत सिंग हे संघाचे कर्णधार असणार आहेत. पुढच्या वर्षी हॉकी विश्व चषक स्पर्धा बेल्जीयम नेदरलँड इथे होणार आहेत. त्याची पात्रता फेरी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. जपान,चीन, कझाक...

August 20, 2025 3:13 PM

views 4

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त आदरांजली

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या ८१व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली आहे. नवी दिल्लीत वीरभूमी इथं राजीव गांधी यांच्या समाधीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पुष्पांजली वाहिली. संसदेच्या क...

August 20, 2025 3:02 PM

views 15

देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज

मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बेळगाव आणि उत्तर कन्नड जिल्ह्यांमध्ये सतत जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.    उत्तराखंडाच्या विविध भागात गेल्या अनेक दिवसांपासून ...

August 20, 2025 1:16 PM

views 19

२० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिकला रौप्य पदक

बल्गेरियात सामोकोव्ह इथे सुरू असलेल्या २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या सुमित मलिक याने रौप्य पदक मिळवलं आहे. अंतिम फेरीत त्याला रशियाच्या मॅगोमेड ओडझामिरो याच्याकडून ५-८ असा पराभव पत्करावा लागला. महिला गटात सृष्टीने ६८ किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिने उपांत्य फेरीत जर्म...