September 7, 2025 8:00 PM

views 34

जीएसटी करसुधारणांमुळे ई-कॉमर्स क्षेत्राअंतर्गत ऑनलाइन खरेदी स्वस्त होणार

नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आता ५ टक्के आणि १८ टक्के अशी द्विस्तरीय कर व्यवस्था असेल, तसंच उपकर व्यवस्था संपुष्टात आणली जाणार असल्याची घोषणा केली. या सुधारणांमुळे ई-कॉमर्स क्षेत्राअंतर्गत ऑनलाइन खरेदी स्वस्त होणार असून, त्यामुळे उद्योग व्यवसायांन...

September 7, 2025 4:01 PM

views 71

अनुपर्णा रॉय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार

इटलीमधे व्हेनीस इथं आयोजित ८२व्या व्हेनीस आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना ‘साँग्ज ऑफ फरगॉटन ट्रीज’या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरीजॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून त...

September 7, 2025 3:54 PM

views 35

राज्यात ठिकठिकाणी भक्तीभावानं गणरायाला निरोप

राज्यात इतरत्रही भक्तीभावानं गणरायाला निरोप दिला गेला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदंगांच्या तालावर गणरायाला निरोप देण्यासाठी निघालेल्या भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं चित्र दिसत होतं. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं विसर्जन झालं, मात्र काही ठिकाणी आज दुपारपर्यंत विसर्जन मिरवणुका सुर...

September 7, 2025 3:45 PM

views 76

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अरीना साबालेंका हिला सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. तिनं अमांडा अनिसिमोव्हा हिच्यावर ६-३, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात करून कारकीर्दीतलं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरॅशिओ झेबोलास या जोडीनं ज...

September 7, 2025 3:39 PM

views 44

जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा द्यायचा निर्णय

जपानमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘एलडीपी’, अर्थात,  ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’मध्ये पडणारी संभाव्य फूट टाळण्याकरता जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात इशिबा यांच्या एलडीपी प्रणित आघाडी सरकारनं तिथल्या वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावल्यानंतर आता जपानचं ...

September 7, 2025 3:32 PM

views 11

प्रधानमंत्र्यांची फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्याशी दूरध्वनीवरून आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनमधे सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची भूमिका असल्याचं मोदी यांनी या चर्चेत सांगितलं. भारत आणि फ्रान्समधल्या द्विपक्षी...

September 7, 2025 3:23 PM

views 39

वस्तू आणि सेवा कर परिषदेचे कराच्या रचनेत क्रांतिकारी बदल

वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले.  पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या बाटल्या, निपल्स, डायपर्स, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला ...

September 7, 2025 8:16 PM

views 21

वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल – शिवराज सिंह चौहान

वस्तू आणि सेवा कर-जी.एस.टी.च्या नव्या दरांचा कृषी क्षेत्राला मोठा लाभ होईल असं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी  केलं आहे. भोपाळ इथं काल पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी या बदलांचा विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला. शेतीच...

September 7, 2025 2:30 PM

views 16

अनंतचतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

देशभरात काल अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाने गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता झाली. पुढच्या वर्षी लौकर येण्याचं आवाहन करीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईत अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अद्याप सुरू आहे. कालपासून गिरगाव चौपाटीसह विविध व...

September 7, 2025 3:24 PM

views 4

बहुपक्षीय जागतिक व्यापारपद्धतीप्रति भारत वचनबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन

जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निःपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने निवेदनात दिली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या काल झालेल्या बैठकीत भारताने सामायिक समृद्धीसाठी सामूहिक प्रयत्न करण्यावरह...