September 10, 2025 9:17 AM

views 153

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत विजयी

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीमध्ये विजयी झाले आहेत. या पदासाठी काल झालेल्या निवडणुकीत राधाकृष्णन यांनी आपले प्रतिस्पर्धी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांचा १५२ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत ७८१ पैकी ७६४ सदस्या...

September 10, 2025 9:14 AM

views 15

प्रधानमंत्र्यांकडून पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशसाठी मदतनिधीची घोषणा

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल पूरग्रस्त पंजाब आणि हिमाचल प्रदेशचा दौरा केला आणि या भागाची हवाई पाहणी केली तसंच पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधला.   पूरग्रस्त पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. यापुर्वी जाहीर करण्यात आलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या म...

September 10, 2025 9:03 AM

views 19

भारतील नेपाळसाठी जाणाऱ्या विमानसेवा स्थगित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेपाळमधील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक काल घेतली. नेपाळ मधील हिंसा ही हृदय द्रावक आहे. नेपाळमधील तरुणांच्या जिवीतहानीबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं तसंच नेपाळच्या स्थिरता,शांती आणि समृद्धीच महत्व आपल्या समाज मध्यमांवरील संदेशामधून अधोरेख...

September 9, 2025 8:42 PM

views 48

नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात

नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत वितरित झाला. राज्यातल्या साडे ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार याप्रमाणे सुमारे १९०० कोटी रुपये जमा होतील. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांचे अ...

September 9, 2025 3:37 PM

views 30

रायगड जिल्ह्यात ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात स्फोट

रायगड जिल्ह्यात उरण इथल्या ओएनजीसी प्रकल्पाच्या गँस प्रोसेसिंग विभागात काल स्फोट होऊन परिसरातल्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.    गॅस पाईपलाईन गरम झाल्यानं ही दुर्घटना झाल्याचा अंदाज असून स्फोटानंतर आगीचे लोट पसरले होते. परिसरातल्या घरांना हादरे बसले, काचा, तावदाने फुटली.. मात्र सुदैवानं...

September 9, 2025 3:23 PM

views 30

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा सामना लाईन क्रिस्टोफर बरोबर होणार

हाँगकाँग २०२५ च्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. ऑलम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूचा भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफर बरोबर खेळणार आहे.   भारताच्या एच.एस.प्रणोय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक...

September 9, 2025 3:12 PM

views 39

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नव्या संसद भवनात मतदान सुरू

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान  सुरू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, माजी प्रधानमंत्री एच डी ...

September 9, 2025 3:10 PM

views 25

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

उपसा जलसिंचन योजनांसाठीच्या वीज दर सवलतीला मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला.   अतिउच्चदाब, उच्चदाब, आणि लघुदाब उपसा जलसिंचन, अशा सर्व प्रकारच्या १ हजार ७८९ योजनांना वीज दरात सवलत मिळत असल्यानं या मुदतवाढ...

September 9, 2025 3:07 PM

views 13

प्रधानमंत्री आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूर स्थितीचा तसंच मदत कार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत.   हिमाचल प्रदेशातल्या आपद्ग्रस्त भागाची त्यांनी हवाई पाहणी केली. धर्मशाला इथे ते राज्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतील...

September 9, 2025 2:33 PM

views 9

मॉरिशसचे प्रधानमंत्र्यांचं 8 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा रामगुलाम यांचं आज आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं. रामगुलाम यांनी यापूर्वी मे २०१४ मध्ये भारताला भेट दिली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शप...