September 11, 2025 2:37 PM

views 33

बडगामपासून ते आदर्श नगर पर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार- रेल्वे मंत्री

जम्मू-काश्मीरमध्ये बडगामपासून ते दिल्लीतल्या आदर्श नगर स्थानकापर्यंत पार्सल वाहून नेणारी एक विशेष रेल्वे गाडी सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.   या रेल्वेतून फळे आणि हस्तकला विक्रेत्यांना त्यांची उत्पादनं देशभरात पोहोचवता येतील, असं वैष्णव आपल्या समा...

September 11, 2025 2:32 PM

views 28

चार्ली किर्क यांचा अमेरिकेतल्या उटाह व्हॅली विद्यापीठात झालेल्या गोळीबारात मृत्यू

अमेरिकेतले कंझर्वेटिव्ह विचारांचे राजकीय कार्यकर्ते तसंच टर्निंग पॉईंट यू एस ए या संस्थेचे सहसंस्थापक चार्ली किर्क यांचा अमेरिकेतल्या उटाह व्हॅली विद्यापीठात झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावर त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. 

September 11, 2025 2:28 PM

views 39

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानचा नकार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.   पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्...

September 11, 2025 2:23 PM

views 25

सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ

रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ झाला. जेद्दाह इथला भारतीय वाणिज्य दूतावास, रियाधमधला भारतीय दूतावास तसंच भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यातून या दोन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. &nb...

September 11, 2025 1:39 PM

views 25

नेपाळमधे अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा

नेपाळमधील अलीकडील घडामोडींमुळे तिथं अडकलेल्या प्रवाशांना मदत करण्यासाठी एअर इंडिया आणि इंडिगोनं दिल्ली ते काठमांडू आणि परत येण्यासाठी विशेष उड्डाणांची घोषणा केली आहे. नियोजित उड्डाणे सुरू झाली आहेत आणि आजपासून पुन्हा सुरू होतील असं सांगून एयर इंडियानं प्रवाशांना त्यांच्या संकेतस्थळावर उड्डाणांची स्थ...

September 11, 2025 1:34 PM

views 25

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी

दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत, अ गटात भारताने काल संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. युएईच्या संघानं ५८ धावाचं लक्ष्य भारतापुढे ठेवलं होतं, ते केवळ ४ षटकं आणि तीन चेंडूत पूर्ण करताना केवळ एक गडी गमावला.   अभिषेक वर्मानं १६ चेंडूत ३० धावा केल्या तर त्याला...

September 11, 2025 1:28 PM

views 15

कुख्यात गुन्हेगार मुनवर खानला कुवेतहून भारतात परत आणण्यात सीबीआयला यश

फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार मुनवर खान याला कुवेतहून भारतात परत आणण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे.    यात इंटरपोल, एनसीबी कुवेत आणि एमईएचं सहकार्य मिळाल्याचं केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं म्हटलं आहे. कुवेत पोलिसांनी मुनवर खानला आज हैदराब...

September 11, 2025 1:24 PM

views 30

नेपाळमधे अराजकाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागात सुरक्षेत वाढ

नेपाळमधे अराजकाच्या पार्श्वभूमीवर अंतरिम सरकारच्या स्थापनेसाठी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल, लष्करप्रमुख अशोकराज सिगडल आणि तरुणांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा सुरू आहे.   अंतरिम सरकारचं नेतृत्व करण्यासाठी युवा प्रतिनिधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सुशीला कार्की यांच्या नाव...

September 11, 2025 1:15 PM

views 10

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. गांधीवादी विचारसरणीचे विनोबा भावे यांनी आपलं संपूर्ण जीवन उपेक्षितांच्या कल्याणासाठी समर्पित केलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावर त्यांना अभिवादन केलं आहे.   स्वामी विवेक...

September 11, 2025 1:14 PM

views 29

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे.