September 11, 2025 8:18 PM

views 16

देशासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानावर तोडगा काढण्यावर प्रयत्न सूरु- नेपाळचे राष्ट्रपती

देशासमोर सध्या उभ्या राहिलेल्या आव्हानावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचं नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी म्हटलं आहे. संविधानाच्या चौकटीत राहून उपाय शोधताना देशात शांतता प्रस्थापित करणं तसंच कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करणं हे आपलं उद्दिष्ट आहे, असं ते म्हणाले.    विविध वि...

September 11, 2025 8:15 PM

views 25

इंडोनेशियामधल्या आलेल्या पुरात चौदा जणांचा मृत्यू

इंडोनेशियामधल्या बाली इथं अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात चौदा जणांचा मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता आहेत. शेकडो घरं पाण्याखाली गेली असून सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे बचावपथकांना बाधित ठिकाणी पोहोचायला अडचण येत आहे. तुंबलेल्या गटारांमुळे यात आणखी भर पडत आहे. तसंच पूरस्थितीचा पर्यटनावरही परिणा...

September 11, 2025 8:13 PM

views 39

पंजाबमध्ये फाझिल्का इथे दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक

पंजाबमध्ये फाझिल्का इथे सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत दोन शस्त्रास्त्र तस्करांना अटक करण्यात आली. या तस्करांकडून २७ पिस्तुलं आणि ४७० जिवंत काडतुसं सापडली आहेत.   हे दोघेही सीमेपार शस्त्रांची तस्करी करत होते. ही शस्त्रं पाकिस्तानमधून एका परदेशी संघटनेमार्फ...

September 11, 2025 8:06 PM

views 15

भारत – अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरुप येईल- केंद्रीय वाणिज्य मंत्री

भारत - अमेरिका व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला  येत्या नोव्हेंबरपर्यंत अंतिम स्वरुप येईल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज पाटणा इथं बातमीदारांशी बोलत होते.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या फेब्रुवारीत तशा ...

September 11, 2025 8:03 PM

views 22

भारत आणि मॉरिशस यांच्यात ४ सामंजस्य करार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी भारत आणि मॉरीशस यांच्यात चार सामंजस्य करार झाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याचा करार, राष्ट्रीय सागरीविज्ञान संस्था आणि वैज्ञानिक औद्योगिक संशोधन परिषदेचा मॉरि...

September 11, 2025 7:55 PM

views 15

जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावावी – केंद्र सरकार

जीएसटीतल्या दरकपातीनंतर कमी होणाऱ्या दरांची माहिती दुकानात लावण्याच्या सूचना केंद्र सरकारनं विक्रेत्यांना केल्या आहेत. घाऊक तसंच किरकोळ विक्रेते दोघांनाही हे फलक लावावे लागणार आहेत. तसंच जीएसटीच्या वेबसाइटवरही ही यादी प्रदर्शित करावी लागणार आहे. विविध उद्योग संघटनांच्या बैठकीत केंद्रीय अप्रत्यक्ष कर...

September 11, 2025 7:54 PM

views 39

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत १० नक्षलवादी ठार, २६ जणांना अटक

छत्तीसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यातल्या मैनपूर भागात आज सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. मृतांमध्ये  सुमारे १ कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी संघटनेचा कमांडर मनोज याचाही समावेश आहे. या भागातल्या जंगलात मोठया संख्येनं नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षादलानं शोध मो...

September 11, 2025 7:44 PM

views 57

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय १६ जणांचा संघ जाहीर

पहिल्यावहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारताने सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल.   तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट्राची गंगा कदम सांभाळणार आहे. ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि बंगळुरू इथं ही स्पर्धा होईल. यात भारतास...

September 11, 2025 7:34 PM

views 12

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा लार्सन आणि टुब्रो कंपनीबरोबर करार

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेनचं बांधकाम, पुरवठा आणि चाचणीसंदर्भात नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने लार्सन आणि टुब्रो कंपनीबरोबर करार केला. यात मुंबई बुलेट ट्रेन स्थान आणि महाराष्ट्र-गुजरात सीमेवरच्या झरोली गावादरम्यान एकूण १५७ किलोमार्गाचं संरेखन, चार स्थानकांसाठी रुळाचं काम आणि ...

September 11, 2025 7:21 PM

views 13

मराठा आरक्षणासंदर्भात जीआर मागे घ्यावा- ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ

मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरमधली संदिग्धता दूर करावी किंवा हा जीआर मागे घ्यावा अशी मागणी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिकमधे वार्ताहर परिषदेत केली. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचं प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, आरक्षणासारख्या संवैधानिक विषयात अशा प्रक्रियेचा अवलंब करणं धोकादायक आहे,...