September 15, 2025 10:23 AM

views 38

महाराष्ट्रासह देशाच्या इशान्ये कडील राज्यांना पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र आणि इशान्ये कडील राज्यांना पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा,अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे....

September 15, 2025 10:19 AM

views 46

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील ग्रुप एच्या सामन्यात काल भारताने पाकिस्तान संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. दुबईमध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघानं 19 षटकं आणि 3 चेंडूत 127 धावा केल्या.   ही लक्ष्य पार करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्...

September 15, 2025 10:07 AM

views 47

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कोलकाता इथं संरक्षण दलाच्या संयुक्त कमांडरर्स परिषदेला संबोधित करणार आहेत. भारतीय लष्कराच्या पूर्व कमांड मुख्यालय, असलेल्या विजय दुर्ग इथं कमांडर्स परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ही परिषद 17 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या कार्य...

September 15, 2025 10:05 AM

views 22

संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला मंजुरी

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेद्वारे संरक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावलीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल मंजुरी दिली. यामुळे संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या सेवांसाठी खरेदी जलद होईल, सोप्या प्रक्रियेद्वारे देशांतर्गत उद्योग सक्षम होतील, नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रोत्साह...

September 15, 2025 10:01 AM

views 519

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा आज शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकरणार आहेत. आचार्य देवव्रत यांचं काल अहमदाबादहून मुंबईत आगमन झालं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. आज सकाळी 11 ...

September 14, 2025 8:26 PM

views 27

आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या कर सुधारणांमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार स्वस्त होणार

वस्तू आणि सेवा कराअंतर्गत केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्राशी संबंधित केलेल्या कर सुधारणांमुळे औषधं, वैद्यकीय उपकरणं आणि उपचार स्वस्त होणार आहेत. जीएसटीमध्ये झालेल्या सुधारणांनुसार, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या ३६ जीवरक्षक औषधांवरचा वस्तू आणि सेवा कर रद्द केला असल्यानं...

September 14, 2025 8:22 PM

views 27

ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून परदेशी इंधनावरचं अवलंबित्व कमी होत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममधल्या गोलाघाट जिल्ह्यात बांबूंपासून बनवलेल्या पहिल्या जैव शुद्धीकरण आणि जैव इथेनॉल प्रकल्पाचं उदघाटन तसंच नुमालीगड इथल्या पॉल...

September 14, 2025 8:21 PM

views 6K

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांचा शपथविधी

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, हे उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतील. उद्या सकाळी ११ वा. त्यांचा शपथविधी होईल. या शपथविधी समारंभासाठी त्यांचं आज मुंबईत आगमन झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर त्यांचं स्वागत केलं....

September 14, 2025 8:19 PM

views 28

World Boxing Championships: जस्मिन लँबोरिया आणि मीनाक्षी हूडाला सुवर्ण पदक

ब्रिटनमध्ये लिव्हरपूल इथं झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या जस्मिन लँबोरिया  आणि मीनाक्षी हूडानं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. भारताच्या महिला खेळाडूंनी या स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची पदक विजेती असलेल्या जस्मिननं महिलांच्या ५७ किलो वजनी गटाच्य...

September 14, 2025 4:07 PM

views 43

आसाममध्ये पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भूमिपूजन

भारत जगातला सर्वात वेगानं विकसित होणारा देश असून त्याचप्रमाणे  आसाम देखील देशातल्या सर्वात जलद वाढ नोंदवणाऱ्या राज्यांपैकी एक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज आसाममध्ये दरांग इथं १८ हजार ५३० कोटी रुपयांच्या पायाभूत आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचं उद्घा...