September 16, 2025 4:00 PM

views 46

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होणार

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. 'ऑपरेशन पोलो' या लष्करी कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच...

September 16, 2025 3:59 PM

views 67

‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाला उद्यापासून सुरुवात

स्वच्छताही सेवा या अभियानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हे अभियान यंदा स्वच्छतोत्सव म्हणून साजरं होणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत दिली. या अभियानादरम्यान देशभर मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिमा आणि श्रमदान होणार असल्याचं ...

September 16, 2025 3:57 PM

views 35

राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात अनेक ठिकाणी अद्याप पावसाचा जोर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, सिल्लोड, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिल्लोड तालुक्यातल्या घटनांद्रा इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ढगफुटी सदृश...

September 16, 2025 3:52 PM

views 208

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं याआधी ठरवून दिलेली कालमर्यादा न पाळल्याबद्दल न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आणि ३१ जानेवारी २०२६ पर्यंत सर्व निवडणुका घेण्याचे निर्देश दिले. यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही न्या...

September 16, 2025 3:55 PM

views 253

राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा

राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी व्यक्तिगत कारण देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये डॉ. सराफ यांची महाधिवक्ता पदावर नियुक्ती झाली होती, आता तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर ३० सप्टेंबर रोजी पदभार सोडतील.

September 16, 2025 3:54 PM

views 23

जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर इथं आयोजित जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्य शासन कौशल्य विद्यापीठाअंतर्गत 'जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल, ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्र...

September 16, 2025 3:52 PM

views 967

Cabinet Decisions: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. यासाठी सन २०५० पर्यंतचं नियोजन असून सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसंच राज...

September 16, 2025 3:44 PM

views 308

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उद्यापासून सुरूवात

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरूवात होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरूवात होणार आहे. तसंच मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या अभियान...

September 16, 2025 3:28 PM

views 4

हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधे पावसामुळे जनजीवन विस्कळीत

उत्तराखंडमध्ये देहरादून इथे सहस्त्रधारा भागात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य करून १०० जणांना सुरक्षितपणे वाचवलं. संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागात रस्ते आणि पुलांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी बाधित जिल्...

September 16, 2025 3:26 PM

views 35

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. रामगुलाम आज राष्ट्रपतींची भेट घेणार

मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी चर्चा केली.  आठ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रामगुलाम तिरुपती भेटीनंतर नवी दिल्लीत पोहोचले आहेत. आज सकाळी त्यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रप...