September 17, 2025 3:06 PM

views 60

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ

नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि ८व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.   हे दोन्ही उपक्रम आजपासून दोन ऑ...

September 17, 2025 2:58 PM

views 27

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार

जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आज मैदानात उतरणार आहे. जपानची राजधानी टोक्यो इथं होणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात नीरजचा सामना डायमंड लीगचा विजेता ज्युलियन वेबर, केशॉर्न वॉलकॉट, जेकब वादलेच आणि भारताचाच सचिन यादव यांच्याशी होईल.   भारती...

September 17, 2025 2:56 PM

views 10

वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू

जम्मू-काश्मीरमध्ये खराब हवामान आणि वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे गेले २२ दिवस बंद असलेली वैष्णोदेवी यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. यासाठी कटरा इथं मोठ्या प्रमाणात भाविक जमले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं सर्व व्यवस्था केल्या आहेत.

September 17, 2025 2:50 PM

views 31

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सामना सुरू

महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधण्यासा...

September 17, 2025 2:52 PM

views 13

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी

पूरग्रस्त पंजाब राज्यासाठी केंद्र सरकारने राज्य आपत्ती मदत निधीला अतिरिक्त २४० कोटी ८० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी जारी केला आहे, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी समाज माध्यमावर दिली आहे.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पंजाबसाठी सोळाशे कोटी रुपयांची मदत जाहीर के...

September 17, 2025 2:41 PM

views 6

पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाचा मूलभूत सेवांसाठी वापर करण्यात येणार

केंद्र सरकारने तामिळनाडू आणि आसाममधल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगाचं ३४२ कोटी रुपयांहून अधिकचं अनुदान जारी केलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी तामिळनाडूसाठी १२७ कोटी आणि आसामसाठी २१४ कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता जारी करण्यात आल्याची माहिती पंचायती राज मंत्रालयान...

September 17, 2025 2:37 PM

views 73

कलाकुसरीच्या वस्तूंवरच्या जीएसटीतही घट

जीएसटी प्रणालीत सुधारणा करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केली होती. त्यानुसार, जीएसटी परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले जीएसटीचे दर कमी केले आहेत. आज जाणून घेऊया, अशा काही वस्तूंबद्दल, ज्यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आला आहे.  ...

September 17, 2025 2:32 PM

views 14

कुख्यात गुन्हेगार छोटा राजनचा जामीन रद्द

कुख्यात गुन्हेगार छोटा राजनला एका हत्या प्रकरणात मिळालेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.  न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप महेता यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला.   मुंबईतला हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी याच्या हत्येप्रकरणी छोटा राजनला खालच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा  दि...

September 17, 2025 1:37 PM

views 18

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातल्या शहीदांना मुक्तिदिनानिमित्त अभिवादन

हैद्राबाद मुक्तिदिन आज साजरा करण्यात येत आहे. प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रांत भारतीय संघराज्यात विलीन झाला. महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तिदिनही आज साजरा होत आहे.   छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी...

September 17, 2025 10:02 AM

views 23

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज मध्यप्रदेशात धार इथं “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियानाचा प्रारंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या हस्ते दुपारी धार इथं "स्वस्थ नारी सशक्त परिवार" आणि "8 व्या राष्ट्रीय पोषण माह" अभियानाला प्रारंभ होणार आहेत. ही मोहीम आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील. या कालावधीत देशभरातली आयुष्मान आरोग्य मंदिरं, सामुदायिक आरोग्य कें...