September 25, 2025 1:41 PM

views 38

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू  असल्याचं मत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकीयन यांनी व्यक्त केलं आहे.    याआधी पेझेशकीयन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इ...

September 25, 2025 1:41 PM

views 22

भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवर अनेक आव्हानं आणि अनिश्चित वातावरण असूनही भारताची विकास वाटचाल लक्षणीय असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उत्तरप्रदेशात ग्रेटर नॉयडा इथं आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. आत्मनिर्भरतेचा मंत्रच भारताला तारून नेईल, असं ते म्हणाले.   ...

September 24, 2025 8:37 PM

views 10

भारत मंडपम इथं उद्यापासून वर्ल्ड फूड इंडिया २०२५ व्यापार प्रदर्शनाचं आयोजन

नवी दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं उद्यापासून रविवारपर्यंत वर्ल्ड फूड इंडिया २०२५ हे व्यापार प्रदर्शन आयोजित केलं असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महोत्सवाचं उदघाटन करतील. यंदा या प्रदर्शनाचं चौथं वर्ष आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना देणं, आणि भारताच्या समृद्ध अन्न संस्कृतीची जगाला...

September 24, 2025 8:34 PM

views 34

ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं निधन

कर्नाटकमधले ज्येष्ठ साहित्यिक एस एल भैरप्पा यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. वंशवृक्ष, सार्थ, तंडा, काठ, धर्मश्री या कादंबऱ्यांसह त्यांनी विपुल लिखाण केलं आहे. त्यांच्या अंचू, आवेषण, आवरण, तंतू या कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद झाला आहे. कानडीसह मराठी आणि हिंदी भाषेत त्य...

September 24, 2025 8:34 PM

views 51

गडचिरोलीत सहा जहाल माओवाद्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली जिल्ह्यात ६ जहाल नक्षली अतिरेक्यांनी आज पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या समोर आत्मसमर्पण केलं. यात तीन महिला तर तीन पुरुष नक्षल्यांनी शस्त्र ठेवली असून यात जहाल नक्षली भीमण्णा आणि त्याची पत्नी विमलाक्का यांचा समावेश आहे. यापैकी  दोन विभागीय समिती सदस्य, एक कमांडर, दोन पीपीसीएम तर  एक एस...

September 24, 2025 8:32 PM

views 6

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथं ७१ माओवाद्यांचंआत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये दंतेवाडा इथं आज ७१ माओवाद्यांनी सुरक्षा दलांपुढं आत्मसमर्पण केलं. यात २१ महिलांचा समावेश आहे. यातल्या ३० नक्षलवाद्यांवर एकूण ६४ लाख रूपयांचं बक्षिस सरकारनं जाहीर केलं होतं. या भागातल्या विविध नक्षलवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग होता. दंतेवाडा जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या “लोने वर्...

September 24, 2025 8:29 PM

views 23

सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या ६ प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशाच्या जहाजबांधणी आणि आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या सुमारे ९५ हजार कोटी रुपयांच्या ६ प्रस्तावांना आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या क्षेत्राच्या पुनर्सक्षमीकरणासाठी आणि अनुकूल पर...

September 24, 2025 8:25 PM

views 26

राज्यसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा

राज्यसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज  निवडणूक आयोगानं केली. फेब्रुवारी २०२१पासून रिक्त असलेल्या या जागा जम्मू काश्मीर राज्यातून भरावयाच्या आहेत.पंजाबच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम देखील आयोगानं घोषित केला. ६ ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना निघेल आणि २४ ऑक्टोब...

September 24, 2025 8:17 PM

views 31

ISSF Junior World Cup: ज्युनियर विश्वचषक स्पर्धा नवी दिल्लीत सुरू

आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या कनिष्ठ गट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून उद्यापासून मुख्य स्पर्धा सुरु होत आहेत. भारतीय चमूत ६९ खेळाडू आहेत. डॉ. करणी सिंग शूटिंग रेंज इथे ही स्पर्धा होत असून ती २ ऑक्टोबर पर्यंत चालेल. भारतासह अमेरिका,इटली,इराण,ब्रिटन कतार,स्पेन अशा मान्यवर देशातले २१ ...

September 24, 2025 3:14 PM

views 35

नांदेडमध्ये पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त

नांदेड शहरात मगनपुरा भागातून पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून १ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे....