September 28, 2025 7:48 PM

views 71

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूर ला सुवर्णपदक

आयएसएसएफ कनिष्ठ गट जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनुष्का ठोकूरने आज मुलींच्या ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. नवी दिल्लीत सुरु असलेल्या या स्पर्धेतलं हे तिचं दुसरं सुवर्णपदक आहे. मुलांच्या स्पर्धेत एड्रियन कर्माकारला रौप्य पदक मिळालं. स्पर्धेत आतापर्यंत ४ सुवर्ण, ६ रौप्य आणि...

September 28, 2025 7:44 PM

views 37

कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट

येत्या २ दिवसात राज्यात सर्वत्र बहुतेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात आजकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट तर उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे.    

September 28, 2025 7:40 PM

views 17

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात तिरियारपाणीच्या जंगलात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १४ लाख रुपयांचं बक्षीस होतं. घटनास्थळावरून बंदुका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या भागात सात ते आठ माओवादी लपून बसल्याची माहिती जिल्हा राखीव पोलिसांना मिळाली होती...

September 28, 2025 7:38 PM

views 40

नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकरा वर्षांआधी जम्मू काश्मीरमधली फुटीरतावादी चळवळ, नक्षलवादी चळवळ आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ हे तीन अंतर्गत धोके सर्वात मोठे होते. मात्र रालोआ सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही ठिकाणच्या फुटीरतावादी चळवळी मोडून पडल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं श्यामा...

September 28, 2025 7:26 PM

views 28

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर परिणाम

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर झालेल्या परिणामाबद्दलची माहिती आज ऐकूया...... होल्ड- व्हॉईस कास्ट (मखाण्यापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय फळांचे रस, मुरांबे आणि लोणच्यांवरचा तसंच फरसाण आणि सॉसेस वरचा करही १२ टक्क्या...

September 28, 2025 7:00 PM

views 124

राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम

राज्यात अनेक ठिकाणी आजही मुसळधार पाऊस होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार होत असून कन्नड तालुक्यातल्या शिवना नदीला पूर आला आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून विविध प्रकल्पांमधून मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे अनेक नद्यांन...

September 28, 2025 7:01 PM

views 86

आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी – प्रधानमंत्री

आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतून...

September 28, 2025 3:13 PM

views 437

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण स...

September 28, 2025 2:02 PM

views 37

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा इराणचा आरोप

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणच्या अणुप्रकल्पांना आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून २०१५ मधे अमेरिकेने या कराराचा मसुदा तयार केला होता. मात्र अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तो फेटाळला असून फ्रान्स ब्रिटन आणि जर्मनीने ...

September 28, 2025 8:13 PM

views 46

तमिळनाडूत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४०

तामिळनाडूत करूर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक विजय यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या एका रॅलीदरम्यान काल झालेल्या दुर्...