October 6, 2025 7:15 PM

views 891

बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. एकूण २४३ पैकी पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघात मतदान होणार आहे.     जम्मू काश्मीर, रा...

October 6, 2025 3:39 PM

views 148

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी  अंतिम  प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजूरी दिली आहे. ही  प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे.

October 6, 2025 3:35 PM

views 27

विकसित भारतासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं-नितीन गडकरी

भारत हा जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं २० व्या एफ आय सी सी आय उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. कोणत्याही देशाच्या प...

October 6, 2025 3:08 PM

views 40

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत - कतार यांच्या दरम...

October 6, 2025 3:05 PM

views 63

संरक्षणमंत्री येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. ...

October 6, 2025 3:02 PM

views 32

सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या चौकशीसाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन

राजस्थानातल्या जयपूरमधल्या एस एम एस रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृवाखाली ही  समिती काम करणार आहे. या दुर्घटनेत जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल...

October 6, 2025 2:46 PM

views 102

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला.भारतानं दिलेल्या  247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. क्रांती गौड सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. स्पर्धेत भारताचा हा दुसरा विज...

October 6, 2025 2:43 PM

views 58

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जबाब मागितला

लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आद...

October 6, 2025 1:48 PM

views 35

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी  आठ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे  . येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती द...

October 6, 2025 1:33 PM

views 29

Bihar: मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत २१ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी हस्तांतरित केला. एकवीसशे कोटी रुपयांचं हे हस्तांतरण म्हणजे या योजनेचा तिसरा टप्पा आ...