राजस्थानातल्या जयपूरमधल्या एस एम एस रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृवाखाली ही समिती काम करणार आहे. या दुर्घटनेत जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दिल्या आहेत. या रुग्णालयाच्या अति दक्षता विभागात आग लागल्यानं ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
Site Admin | October 6, 2025 3:02 PM
सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या चौकशीसाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन