भारतात परंपरा आणि नवोन्मेष, आध्यात्मिकता आणि विज्ञान, औत्सुक्य आणि सर्जनशीलता हातात हात घालून चालतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री संबोधित करत होते. भारतीय अनेक शतकांपासून अवकाशाचं निरीक्षण करत आले आहेत.
पाचव्या शतकात आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावला, पृथ्वी ही तिच्या अक्षाभोवती फिरते हे त्यांनीच सांगितलं, याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी आवर्जून केला. विज्ञानाच्या क्षेत्रात भारताने केलेली प्रगती आणि विविध प्रयोगाविषयी सांगत प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं. यात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री मोदी यांनी स्वागत केलं.
या स्पर्धेत ६४ देशांमधून एकंदर २८८ विद्यार्थी सहभागी झाले आहेत.