January 18, 2026 2:47 PM | Davos | switzerland

printer

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होणार

स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं उद्यापासून जागतिक आर्थिक मंचाची परिषद सुरु होत असून, त्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत ३ हजारापेक्षा जास्त जागतिक नेते सहभागी होणार आहेत. त्यासाठी ५ हजारापेक्षा जास्त सुरक्षा रक्षक, स्नायपर्स, एआय-चालित ड्रोन, हवाई क्षेत्रावर निर्बंध आणि हेरगिरीविरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. ‘अ स्पिरिट ऑफ डायलॉग’ ही यंदाच्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेची संकल्पना आहे.