डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील-प्रधानमंत्र्यांची ग्वाही

18 वी लोकसभा विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करेल, असं सांगून सरकार सर्वांना सोबत घेऊन लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल दिली. संसदेचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरकार चालवण्यासाठी बहुमताची गरज असते, मात्र देश चालवण्यासाठी सर्वांचं एकमत होणं महत्त्वाचं आहे, असं पंतप्रधान म्हणाले.