August 16, 2024 7:06 PM | Mumbai high Court

printer

विनायक राऊतांच्या याचिकेवर नारायण राणेंनी उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

नारायण राणे यांची खासदारकी रद्द करण्यासंबंधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचे निर्देश उच्च न्यायालयानं राणे यांना दिले आहेत.  राणे यांनी अवैध मार्गांनी ही निवडणूक जिंकली असल्याची याचिका राऊत यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यावर आज न्यायलयानं राणे यांना हे निर्देश दिले आहेत.