युरोपीय नेत्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरच्या प्रस्तावित करांचा निषेध केला आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधले संबंध बिघडतील आणि धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी एका संयुक्त निवेदनाद्वारे दिला आहे. प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व ही आंतरराष्ट्रीय कायद्याची मूलभूत तत्त्व असून, आंतरराष्ट्रीय कायद्याचं रक्षण करण्यासाठी युरोपियन युनियन संयुक्त प्रतिसाद देण्याच्या तयारीत असल्याचं यात म्हटलं आहे. फ्रान्स, आणि स्वीडन सह इतर युरोपियन देशांनी या निवेदनाला पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्या योजनेला ग्रीनलँड आणि डेन्मार्कनं तीव्र विरोध दर्शवला असून, कोपनहेगन, आरहस, आल्बोर्ग आणि ओडेंस सह इतर शहरांमध्ये हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली.