January 18, 2026 9:14 AM | Criket | India

printer

भारत-न्यूझीलंड दरम्यान आज इंदूर इथं पन्नास षटकांचा अंतिम सामना

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान ५० षटकांच्या मालिकेतील निर्णायक तिसरा सामना आज इंदूरमधील होळकर मैदानावर आज होणार आहे. पहिला सामना भारतानं जिंकला तर न्यूझीलंडनं दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पन्नास षटकांच्या सामन्यांच्या १९८९ मधील उभय देशांतील भारतातील पहिल्या मालिकेपासून आजतागायत, न्यूझीलंडला यजमानांविरुद्ध मालिका विजय नोंदवता आलेला नाही.