गोवा पोलिसांनी ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईटक्लबचा एक मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. चौकशी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. मागच्या आठवड्यात या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता.
नाईटक्लबचे आणखी दोन मालक पसार असून त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात येणारी ही सहावी व्यक्ती आहे अशी माहिती गोवा पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली.