December 10, 2025 10:24 AM

views 15

‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईटक्लबचा मालक पोलिसांच्या ताब्यात

गोवा पोलिसांनी 'बर्च बाय रोमिओ लेन' नाईटक्लबचा एक मालक अजय गुप्ता याला ताब्यात घेतलं आहे. चौकशी झाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल. मागच्या आठवड्यात या नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता.   नाईटक्लबचे आणखी दोन मालक पसार असून त्यांच्याविरुद्ध नोटीस जारी करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात येणारी ही सहावी व्यक्ती आहे अशी माहिती गोवा पोलिसांच्या प्रवक्त्यानं दिली.

December 8, 2025 3:27 PM

views 34

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगप्रकरणी चार जणांना अटक

गोवा इथल्या एका क्लबमधे लागलेल्या आगीमधे २५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी आज चार जणांना अटक केली आहे .यात अरपोरा नाईट क्लबच्या जनरल मॅनेजरचा समावेश आहे.   क्लबच्या मालकासह मॅनेजर आणि आयोजकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  नाईटक्लबला २०१३ मधे व्यापार परवाना दिल्याप्रकरणी अरपोरा-नाओआ ग्रामपंचायतीच्या सरंपचालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.   दरम्यान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन वार्ताहर परिषदेत बोलताना दिलं आहे.