January 11, 2026 1:54 PM | narendra modi

printer

प्रधानमंत्री आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्यात उद्या अहमदाबाद इथं द्विपक्षीय चर्चा होणार आहे. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, आणि संरक्षण क्षेत्राविषयी यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेनं केलेल्या आक्रमणासह इतर आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असून यात जागतिक आव्हानांवर दोन्ही नेते चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. मर्झ यांचा हा दोन दिवसांचा भारत दौरा ही आशिया खंडातली त्यांची पहिलीच भेट आहे. या भेटीत ते गुजरातमधल्या साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.