नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते – अमित शहा

नक्षलवादाने कोणाचंही भलं होत नाही, शांतीच्या मार्गानेच विकासाची वाट सोपी होते, असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. छत्तीसगडमधे बस्तर ऑलिंपिक्सच्या समारोप सोहळ्यात आज ते बोलत होते. येत्या ३१ मार्चपर्यंत देशातू न नक्षलवादाचं समूळ उच्चाटन करण्याच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. छत्तीसगडमधला बस्तर विभाग येत्या ५ वर्षात देशातला सर्वात विकासित आदिवासी क्षेत्र ठरेल यासाठी केंद्रसरकार कटिबद्ध आहे, असं त्यांनी सांगितलं. सरकारच्या प्रयत्नांमुळे गेल्या २ वर्षात दोन हजारापेक्षा जास्त नक्षली शस्त्रत्याग करुन मु्ख्य प्रवाहात आले, अशी माहिती त्यांनी दिली. बस्तर ऑलिंपिक क्रीडस्पर्धांमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तयार होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री अरुण साव आणि विजय शर्मा कार्यक्रमाला उपस्थित होते. बस्तर विभागातल्या ७ जिल्ह्यांमधून सुमारे साडेतीनहजार खेळाडूंनी या स्पर्धांमधे भाग घेतला. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलींचा आणि नक्षली हिंसेचा फटका बसलेल्यांचा त्यात समावेश होता.