January 18, 2026 10:08 AM | Donald Trump

printer

आठ युरोपीय देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आठ युरोपीय देशांचा ग्रीनलँडवरील नियंत्रणाला विरोध असल्याचं कारण देत त्या देशांतील वस्तूंवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांना हे शुल्क फेब्रुवारीपासून लागू होईल असं समाज मध्यमावरील पोस्ट मध्ये ट्रम्प यांनी म्हंटलं आहे. 

अमेरिकेकडून ग्रीनलँडची संपूर्ण खरेदी म्हणून वर्णन केलेल्या करारावर सहमती  झाली नाही तर १ जूनपासून हा कर २५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.