July 15, 2024 8:00 PM | Pankaja Munde

printer

आमदार पंकजा मुंडे आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा करणार दावा

भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्याबाबत खोटी बातमी चालवणाऱ्या खासगी वृत्तवाहिनीवर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीने वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांच्याबद्दल बातमी प्रसारित केली होती, या बातमीत काहीही तथ्य नसल्याचं सांगत, संबंधित वृत्तवहिनीविरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं मुंडे यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.