गेल्या महिन्यात सिंगापूर इथे झालेल्या झुबिन गर्ग या गायकाच्या मृत्युप्रकरणी गर्ग यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना आज अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता, गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि त्यांचे दोन बँड सदस्य- शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृत प्रभा महंता यांना अटक करण्यात आली आहे.
Site Admin | October 8, 2025 7:49 PM | Zubeen Garg Death
Zubeen Garg Death : गर्ग यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक
