December 26, 2025 10:39 AM | Zubair Hangargekar

printer

जुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडून पुन्हा नव्याने अटक

राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या जुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक म्हणजेच एटीएसने काल पुन्हा नव्याने अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या पुण्याच्या विशेष न्यायालयाने त्याला 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

 

हंगरगेकरच्या टेलिग्राम या समाजमाध्यम खात्यावर अफगाणिस्तान आणि हाँगकाँग मधील आयपी अँड्रेस आढळल्याने त्याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्याला ताब्यात देण्याबाबत एटीएसने युक्तिवाद केला होता. अल कायदा आणि भारतीय उपखंडातील अल कायदा या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध तसेच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून जुबेरला ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती.