January 17, 2026 6:58 PM | zp election congress

printer

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची काँग्रेसची मागणी

राज्यात आगामी जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आपल्या या मागणीसाठी त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाची अल्प टक्केवारी ही जनतेचा निवडणुकीवरचा विश्वास कमी झाल्याचं निदर्शक आहे. देशातल्या अनेक राज्यांनी मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय घेतलेला असताना फक्त महाराष्ट्रात ईव्हीएमचा हट्ट कशासाठी आहे, असा प्रश्नही पटोले यांनी केला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.