डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीचं राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या जागा जाहीर

 झारखंड विधानसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेते राहुल गाधी आज रांची इथं पोहोचत असून ते यावेळी सहयोगी झारखंड मुक्ती मोर्चा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांबरोबर चर्चा करतील. राजद नेते तेजस्वी प्रसाद यादवही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी बैठक करणार आहेत.

 

राष्ट्रीय लोकशाही दल अर्थात एनडीएचा जागावाटपाचे सूत्र ठरले असून भाजपा ६८ जागांवर तर इतर मित्र पक्ष उर्वरित जागांवर निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली असून मतदान १३ नोव्हेंबर ला आहे.