मुंबईत ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिव्हल 2025’ च्या मुख्य प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं.
अनेक दशकांचा वारसा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा असलेल्या झवेरी बाजार परिसराची पुनर्रचना आणि सुशोभीकरण करण्यासाठी झवेरी बाजार वेल्फेअर असोसिएशननं पुढाकार घ्यावा, राज्य शासनाच्या यंत्रणा त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितलं.