January 22, 2026 1:44 PM | zarkhand

printer

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक

झारखंडमधल्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यामधल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलींमधे चकमक झाली. सुरक्षा दलाकडून या परिसरात शोधमोहीम सुरू असताना या चकमकीला सुरुवात झाली. यात काही नक्षली मारले गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बाकीचे नक्षली जंगलात आणि डोंगराळ भागात पळून जाण्यात यशस्वी झाले. सुरक्षा दलाचे जवान त्यांच्या मागावर गेले आहेत.