लडाख झंस्कार महोत्सव २०२४ला प्रारंभ

जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात साजरा होणाऱ्या लडाख झंस्कार महोत्सव २०२४ला सानी या गावातून प्रारंभ झाला. लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर बी. डी. मिश्रा यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात या भागातल्या वैविध्यपूर्ण परंपरा दर्शवणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात लडाखसह हिमाचल प्रदेशातल्या लाहौल, स्पिती, किन्नौर आणि उत्तराखंड या भागातले सांस्कृतिक संघ सहभागी होतील. त्याशिवाय स्थानिक उत्पादनं, विविध खाद्यपदार्थ, हस्तकला यांच्या विक्रीसाठी दालनंही असतील.