युरोपातल्या बहुतांश देशांमध्ये अतिरिक्त उष्मा आणि अवर्षण यासारखे हवामानबदलाचे परिणाम दिसून येत आहेत. बऱ्याच ठिकाणी वाढत्या तापमानामुळे वणवे लागत आहेत परिणामी वनसंपदा आणि प्राण्यांचे जीव धोक्यात येत आहेत.
जर्मनीत वर्षभरातल्या सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवलेल्या दिवशी तापमान जवळपास ४० अंश सेल्सियस होते. स्लोव्हाकियामध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानामुळे रेड अर्लट जारी केला आहे. क्रोएशिया , रोमानिया आणि नेदरलँड्समध्येही तापमानाचा पारा वाढला आहे त्यामुळे हवामान अतिउष्ण आहे. स्पेनमध्ये हे वर्ष आतापर्यंतचं सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंदवलं जात आहे.
स्लोवेनियामध्येही या वर्षी सरासरीच्या २४ टक्केच पाऊस नोंदवत या वर्षीचा जून महिना आतापर्यंतचा सर्वात उष्ण आणि कोरडा महिना म्हणून नोंदवला गेला. दुष्काळी परिस्थिती हे आताच्या काळातलं सर्वसामान्य आणि सर्वाधिक नुकसानकारक संकट असल्याचं तज्ञांच मत आहे. वर्ष २००० ते २०१९ या काळात दुष्काळी परिस्थितीची वारंवारता आधीपेक्षा ३० टक्केंनी वाढली आहे.