लंडनस्थित डॉक्टर आणि लोकप्रिय यूट्युबर संग्राम पाटील यांनी आज सकाळी पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत नोटीस बजावून प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं. भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात पोलिसांनी ही कारवाई केली. डॉ. पाटील आणि त्यांच्या पत्नीला प्रश्न विचारण्यात आले आणि प्राथमिक चौकशीनंतर सोडून दिलं, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पाटील सत्ताधारी पक्षाविरोधात चुकीची माहिती पसरवून नेत्यांविरोधात अपमानास्पद टिप्पणी करतात, असा आरोप भाजपचे माध्यम कक्ष प्रतिनिधी निखिल भामरे यांनी तक्रारीत केला आहे.
Site Admin | January 10, 2026 7:20 PM | YouTuber Sangram Patil
यूट्युबर संग्राम पाटील यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं