डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्यानं युवक आणि खासगी क्षेत्राने पुढाकार घ्यावा-संरक्षण मंत्री

युद्धाच्या नवनवीन प्रकारांमुळे संरक्षण क्षेत्रात नवी आव्हानं उभी राहत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे.संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतर्फे आयोजित डेअर टू ड्रीम फाईव्ह पॉईंट झीरो या नवोन्मेष स्पर्धेचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ड्रोन, सायबर युद्ध, जैविक शस्त्र, असे नवनवीन मार्ग युद्धासाठी वापरले जातात, अंतराळातली संरक्षण व्यवस्था हे देखील नवीन आव्हान असल्याचं ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर युवकांनी आणि खासगी क्षेत्रानं संरक्षण क्षेत्रात पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. संरक्षण क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान यावं यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाल. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचं त्यांनी कौतुक केलं.