केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यात योग बंधन हा १० देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या १० हजारांहून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम यांचाही समावेश आहे, असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | March 13, 2025 1:37 PM | Yoga Mahotsav 2025
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग महोत्सव २०२५चं उद्घाटन