डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

योग दिनानिमित्त जगभरात विविध ठिकाणी योगसाधना कार्यक्रमांचं आयोजन

११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज सकाळपासून करण्यात आलं आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ अशी यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं.

 

मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले. मुंबईतल्या घारापुरी लेणी, बुलडाण्यातलं गायमुख मंदिर, पुण्यातला आगा खानपॅलेस आणि शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबी का मकबरा तर अमरावतीत बौद्ध स्तूप इथं योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं. 

 

याशिवाय आसाममधलं चराईदेव मैदान, गुजरातमधे राणी की वाव आणि धोलावीरा, कर्नाटकात हंपी आणि पट्टदकल, मध्यप्रदेशात खजुराहो मंदिरं आणि सांची स्तूप, ओडिशात कोणार्क सूर्य मंदिर, आणि तामिळनाडूत तंजावर इथल्या बृहदीश्वर मंदिराच्या आवारात योग दिन साजरा झाला. 

 

आजच्या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी देश-परदेशातून नोंदणी केलेल्या योग अभ्यासकांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा