सांस्कृतिक मंत्रालयानं महाराष्ट्रासह देशभरातल्या १०० पर्यटन स्थळांवर आणि ५० सांस्कृतिक स्थळांवर योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं. मुंबईजवळ कान्हेरी लेणी इथं आयोजित योग कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल सहभागी झाले.
मुंबईतल्या घारापुरी लेणी, बुलडाण्यातलं गायमुख मंदिर, पुण्यातला आगा खान पॅलेस आणि शिवनेरी किल्ला, छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबी का मकबरा तर अमरावतीत बौद्ध स्तूप इथं योग सत्रांचं आयोजन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजिंठा लेणी इथं भारतीय पुरातत्त्व खाते आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं संयुक्त पणे आयोजित केलेल्या योग शिबिरात पर्यटक आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनं केली.
आजच्या विशाल योगसंगम कार्यक्रमासाठी देश-परदेशातून नोंदणी केलेल्या योग अभ्यासकांची संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे.