डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी – आयुष मंत्री प्रतापराव जाधव

एक पृथ्वी – एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट – योगा कनेक्ट २०२५ या जागतिक शिखर परिषद होत आहे. या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं.

 

योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी असल्याचं  जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितलं. 

 

यावर्षी योगदिनाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम इथं होणार असून त्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रतापराव जाधव यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीत दिली. योग दिवसानिमित्तानं दिल्ली, भुवनेश्वर, नाशिक आणि पुडुचेरी इथं प्रत्येकी २५ दिवसांचे विशेष कार्यक्रम झाल्याचं त्यांनी सांगितलं. योग दिनाच्या निमित्तानं योग संगम, योग बंधन, योग पार्क, योग समावेश, योग प्रभाव, योग कनेक्ट, हरित योग, योग अनप्लग्ड, योग महाकुंभ आणि संयोग अशा दहा उपक्रमांची आखणी केल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाच्या योग दिनी देशात एक लाखांहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम होणार असल्याचं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा